कोरोना लसीचा डोस न घेणारे नागरिक होत आहेत जास्त प्रमाणात कोरोना बाधीत

कोरोना लसीचा डोस न घेणारे नागरिक होत आहेत जास्त प्रमाणात कोरोना बाधीत

कोरोना व्हायरसरची लाट अद्याप पुर्णपणे देशातून ओसरली नसून. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक राज्यात लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. केंद्र सरकार लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आवाहन करत आहे. जुलै महिन्यात तेरा कोटीपेक्षा जास्त लोकांनी कोरोना लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. पण  झारखंड,मध्य प्रदेश,बिहार सारख्या राज्यात कोरोना लसीचा डोस न घेणारे लोकं कोरोना बाधीत होत असल्याचे आढळून आले आहे. तर लस घेणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण अगदी कमी प्रमाणात आढळून आलं आहे. यामुळे असे स्पष्ट होत आहे की कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचं आहे. पुढील आकडेवारी नुसार आपण कोरोना लस लावणाऱ्या लोकांना तसेच लसीचा डोस न घेणाऱ्या लोकांवर कोरोनाचा कितपत प्रभाव होत आहे हे जाणून घेऊया.

मध्य प्रदेशमध्ये एकून 34 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहीला डोस घेतला आहे.तर 12 टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोनही डोस घेतले आहेत. तसेच राज्यातील आरोग्य विभागाच्या लसीकरण अहवालानुसार कोरोना बाधीत 54 टक्के रुग्णांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाहीये. आणि या 54 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त आहे.

सध्या झारखंडमध्ये 270 संक्रमित कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 89 टक्के रुग्णांनी अद्याप लसीकरण केलं नाहीये. झारखंडमध्ये फक्त 11 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पाहिला डोस घेतला आहे. तसेच यामधील काही अंशी लोक कोरोना बाधीत झाले आहेत. तसेच ज्यांनी कोरोना लसीचा एकही डोज घेतला नाहीये त्या नागरिकांच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे.

बिहारच्या आकड्यांबद्दल सांगायचे झाल्यास या वेळी कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण 456 इतके आहेत यापैकी 170 म्हणजेच 37.28 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाहीये. तसेच 48.24 टक्के लोकांनी कोरोनाचा पहीला डोस घेतला आहे.

कानुरमध्ये सध्या एकून 36 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सध्या रुग्णालयात कोणीही दाखल नाहीये. तसेच गुरूवारी आढळलेल्या 30 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची पाहिली लस घेतली होती.


हे हि वाचा – मेडल्सची संख्या सांगितली नाही; ॲपल सिरीवर चीन विरोधी पक्षपातीपणाचा आरोप

First Published on: August 2, 2021 9:23 AM
Exit mobile version