नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

Rajya Sabha Election : लोकसभेसारखे राज्यसभेमध्येही भाजपकडून मुस्लिम चेहरा नसणार, जाणून घ्या कारण

लोकसभेत मोठ्या बहुमताने मंजूर झालेले Citizenship Amendment Bill आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. लोकसभेत १२ तास वादळी चर्चा झाल्यानंतर आता वरीष्ठ सभागृहात काय चर्चा होते, यावर देशाच्या नजरा लागल्या आहेत. तसेच राज्यसभेत एआयडीएमके, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम आणि शिवसेना काय भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपची राज्यसभेत कसोटी पणाला लागणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना राज्यसभेत काय भूमिका घेते, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज दुपारी २ वाजता राज्यसभेत विधेयक मांडले जाईल. हे विधेयक लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही मंजूर होईल, असा भाजपला विश्वास आहे. मात्र मतविभाजनाच्या वेळी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपची कसोटी लागू शकते. सोळाव्या लोकसभेत देखील भाजपने हे विधेयक खालच्या सभागृहात मंजूर करुन घेतले होते. मात्र राज्यसभेत ते मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळेच यावेळी पुन्हा लोकसभेत विधेयक मंजूर करुन घ्यावे लागले.

विरोधकांचा धार्मिक आक्षेप कायम

विधेयकातील दुरुस्तीला प्रमुख विरोधी पक्षांचा विरोध आहे. नव्या तरतुदी या फक्त बिगर मुस्लिम निर्वासतानांच लागू होत आहेत. धर्मावरुन निर्वासितांची विभागणी विरोधकांना मान्य नाही.

First Published on: December 11, 2019 8:00 AM
Exit mobile version