संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांच्या काश्मीर विधानाचा वाद, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर दिले हे स्पष्टीकरण

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांच्या काश्मीर विधानाचा वाद, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर दिले हे स्पष्टीकरण

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांच्या काश्मीर विधानाचा वाद, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर दिले हे स्पष्टीकरण

पाकिस्तामध्ये संयुक्त राष्ट्र महासभाचे अध्यक्ष वोल्कन बोझकिर यांनी जम्मू काश्मीरवर केलेल्या विधानावर भारताकडून दिशाभूल आणि पूर्वग्रह दुषित म्हटले जात होते. मग याच्या काही दिवसानंतर संयुक्त राष्ट्रच्या १९३ सदस्यीय संघटनेच्या प्रवक्ताने सांगितले की, ‘त्यांचे विधान संदर्भा बाहेर होते हे खेदजनक आहे.’ मागील महिन्यांच्या अखेरीस बोझकिर बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूह कुरैशीसोबतच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, ‘जम्मू काश्मीरच्या मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोर आणणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे.’ यावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, ‘बोझकिर यांचे विधान अस्वीकार्य आहे आणि भारताचा केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरचे त्याच्याद्वारे उल्लेख करणे अवांछनीय आहे.’

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, ‘जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेचे विद्यमान अध्यक्ष दिशाभूल करणार आणि पूर्वग्रहदूषित विधान करतात, तेव्हा ते त्याच्या पदाला मोठे नुकसान पोहोचवतात. संयुक्त राष्ट्र महासभाचे अध्यक्षांचे वर्तन खरोखरच खेदजनक आहे आणि जगातील त्यांची स्थिती कमी करते.;

मंगळवारी संयुक्त राष्ट्र मुख्यालयमध्ये महासभाचे अध्यक्षाचे प्रवक्ते अॅमी कांत्रिल म्हणाले की, ‘पाकिस्तान दौऱ्या दरम्यान बोझकिर म्हणाले होते की, दक्षिण आशियाई क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धी पाकिस्तान आणि भारतामधील संबंधांच्या सामान्य बनण्यावर अवलंबून आहे. जम्मू काश्मीर प्रकरणाच्या ठरावानंतरच संबंध सामान्य होतील. यावेळी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अध्यक्षांनी १९७२चा भारत-पाकिस्तान शिमला करारचीही आठवण केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानामुळे अध्यक्ष नाराज झाले आहेत आणि त्याचे विधान संदर्भातून काढून घेण्यात आले ही खेदाची बाब आहे.’


हेही वाचा – India Corona: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांनी प्राण गमावले


 

First Published on: June 2, 2021 9:11 AM
Exit mobile version