पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. पुलवामाच्या बंडजू भागात चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. परिसरात शोध मोहीम सुरू असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे रविवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केलं. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, शहरातील जुनिमार भागात अतिरेक्यांचा वावर असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी रविवारी सकाळी या भागाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाने गोळीबार सुरु केला. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

ईदनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई सुरू केली असून दहशतवादी संघटनांच्या प्रमुख नेतृत्त्वावर नजर ठेवली आहे. २५ मे रोजी कुलगाममध्ये इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीरचा कमांडर आदिल अहमद वानी आणि लष्कर-ए-तैयबाचा शाहीन अहमद ठोकर यांना ठार मारण्यात आलं. ३० मे रोजी कुलगामच्या वनपोरा भागात सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर परवेज अहमद आणि जैश-ए-मोहम्मदचा शीर्ष कमांडर शाकिर अहमद यांना गोळ्या घातल्या.

 

First Published on: June 23, 2020 8:01 AM
Exit mobile version