Coronavirus – १६ वर्षाच्या मुलाने तयार केली ‘टच फ्री डोअर बेल’!

Coronavirus – १६ वर्षाच्या मुलाने तयार केली ‘टच फ्री डोअर बेल’!

कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली येथील १६ वर्षाच्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वयंचलित डोअरबेल विकसीत केली आहे. नवी दिल्लीत शालीमार बाग येथील मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या शशांक जैनने कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी या डोअरबेल प्रकल्पाची रचान केली आहे.

याविषयी शशांक जैन म्हणाला, कोरोनाची जीव घेणारी साखळी तोडण्यासाठी मी सेन्सॉर असणारी स्वयंचलित डोअर बेल तयार केली आहे. यात लावलेला सेन्सॉर ३० ते ५० सेंचीमीटरवर असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेते. त्यामुळे बेलला स्पर्श न करता त्यातून बीप असा आवाज येतो. सध्या मी सगळ्यांनास मास घालून फिरताना बघतो. एवढच काय तर घरात, बाल्कनीत असणारे सुध्दा मास्क घालून असतात. त्यामुळे मला भिती वाटली की कधीना कधी हा कोरोना आपल्या घरात येऊ शकतो. सगळ्यात आधी माझ्या डोक्यात आले की, घरात येण्यासाठी आधी डोअरबेल वाजवली जाते. त्यामुळे सगळ्यात आधी मी स्मार्ट डोअरबेल तयार करण्याचा विचार केला.

या केवळ १६ वर्षाच्या मुलाच्या म्हणण्यानुसार डोअर बेल हे व्हायरस हस्तांतरीत करण्याचे माध्यम आहे. कारण आपण जासीत जास्तवेळ त्याचा वापर करतो. त्यामुळे विषाणूचा प्रमाण मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे मी हा प्रकल्प तयार केला. मी यासाठी माझ्या मुख्यध्यापिकांचे आभार मानतो. कारण आमच्या शाळेने आम्हाला कायमच नवीन शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.


हे ही वाचा – ऑनलाईन क्लास सुरू असताना तिथेच दिसले अश्लील मेसेज आणि…


 

First Published on: April 21, 2020 2:48 PM
Exit mobile version