हाफ पँट घातली म्हणून ११ वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

हाफ पँट घातली म्हणून ११ वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

आत्महत्या

लुधियानामध्ये शुक्रवारी रात्री ११ वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी मारहाण केल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाफ पँट घातल्यामुळे या विद्यार्थांला कॉलेच्या शिक्षकानी मारहाण केली आणि त्याचा छळ केला. त्यामुळे हा मुलगा गेले दोन दिवसांपासून मानसिक त्रास होत असल्यामुळे तो जेवत ही नव्हता, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. धनंजय कुमार (वय १८) असं या पीडित मुलाचं नावं असून त्याने कॉलेजमधील मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांमुळे आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत दाखल केला आहे.

पीडित मुलाचे वडिले म्हणाले की, धनंजय हा धंधारी या खासगी कॉलेजमध्ये शिकत होता. दोन दिवसांपूर्वी तो कॉलेजमध्ये हाफ पँट घालून गेला होता. शिक्षकांना त्याने घातलेली हाफ पँट योग्य वाटली नाही म्हणून त्यांनी पँट बदलण्यास सांगितली. मग याबाबत शिक्षकांनी मुख्याध्यपकांनाही सांगितलं. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना धनंजयला मारहाण करण्याचा आदेश दिला. त्यामुळे धनंजयचे हात बांधून त्याला सतत मारहाण केली. संपूर्ण वर्गासमोर त्याचे कपडे फाडून त्याचा अपमान केला.

या सर्व घटनेनंतर त्याने कॉलेजमध्ये जाण्याचं बंद केलं आणि त्याने जेवणं देखील बंद केलं, असं पीडित मुलाच्या आईने सांगितलं. शुक्रवारी रात्री आईने त्याला जेवण्यासाठी बोलावलं तेव्हा तो आला नाही. म्हणून त्याची आई जेव्हा त्याच्या खोलीत बोलवण्यासाठी गेली तेव्हा तिने धनंजयला पंख्याला लटकवलेलं पाहिलं. त्यामुळे त्याच्या आईला धक्काचं बसला.

शेजारील लोकांना बोलवून धनंजयला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पीडित मुलाची तक्रार नोंदवली असून लवकरच आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त जसकरणजित सिंग जेता यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: माझ्या मुलाला जाळून टाका – आरोपीची आई


 

First Published on: December 1, 2019 7:00 PM
Exit mobile version