चैथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

चैथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो (सौजन्या- इंशॉर्ट)

हॉस्टेलमध्ये रहात असलेल्या एका चौथीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेला मुलगा हा मुळ बिहारच्या पटना येथील रहिवाशी असून मागील काही वर्षांपासून दार्जिलिंग येथील हॉस्टेलमध्ये राहत होता. या मुलाला मारुन लटकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांकडून आत्महत्येची नोंद केली होती मात्र कुटुंबीय खूनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली असून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

कशी घडली घटना?

मागील काही वर्षांपासून हा मुलगा दार्जिलिंग येथे राहत होता. याच ठिकाणी असलेल्या शाळेत शिकत असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवले. रविवारी सायंकाळी पासून हा मुलगा हॉस्टेलमधून बेपत्ता झाला होता. हॉस्टेलच्या हेड कडून त्याला शोधले जात होते. मात्र काही वेळानी त्याचा गळफास घेतलेला मृतदेह त्यांना आढळला. रॉडला दोरी लावून यामुलाने गळफास घेतल्याचे आढळून आले. याची घटनेची माहिती हॉस्टेलने पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आला. यामुलाच्या आई वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी शाळेतील शिक्षकांची चौकशी केली आहे. मात्र अद्यापही आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

First Published on: July 23, 2018 9:52 PM
Exit mobile version