कपड्यांचे मास्क Corona संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी!

कपड्यांचे मास्क Corona संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी!

कपड्याचे मास्क

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणं, सतत हात धुणं तसेच बाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क प्रभावी ठरत आहेत हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे सापडले आहेत. नव्या संशोधनानुसार, ९९.९ टक्के संक्रमित सूक्ष्म-थेंबांचा प्रसार रोखण्यासाठी घरगुती कपड्यांचे मास्क प्रभावी ठरत असून अशा थेंबांचा प्रसार १०० टक्यांपर्यंत रोखण्यासाठी हे मास्क प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे.

या संशोधनात असे दिसून आले आहे की, एखाद्या मास्क घातलेल्या व्यक्तीपासून सहा फूट अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या संक्रमणाचा धोका मास्क घातलेल्या व्यक्तीपासून १.५ फूट अंतरावर उभे राहण्यापेक्षा १००० पट जास्त संक्रमण होते. एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या रोझलिन इन्स्टिट्यूटच्या टीमने म्हटले आहे की, या संशोधनात असे सूचित केले आहे की संक्रमित व्यक्तीने मास्क घालण्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

प्रीप्रिंट सर्व्हर मेडआरएक्सआयवी डॉट ओआरजीवर प्रकाशित झालेल्या अभ्यासासाठी, टीमने दोन प्रकारचे मास्क घेतले: सर्जिकल मास्क आणि सूती कपड्याचा मास्क. या मास्कवर, पुतळ्यांच्या तोंडातून बाहेर येणारे थेंब आणि माणसांचा खोकला किंवा बोलण्यातून तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांची चाचणी केली गेली. जेव्हा पुतळ्याने दोन्ही मास्क परिधान केले त्यानंतर एयरोसोल स्प्रे करण्यात आले तेव्हा १००० पैकी फक्त एक थेंब बाहेर आला. त्याच वेळी, जेव्हा माणूस मास्कशिवाय खोककला तेव्हा हजारो सूक्ष्म थेंब हवेत पसरल्याचे सिद्ध झाले.

सर्जिकल मास्क हे घरगुती सूती कपड्यांच्या मास्कपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले. कपड्याने बनविलेले मास्क पाच मायक्रोमीटरपर्यंत मोठे थेंब बाहेर पडण्यास सक्षम आहेत, असे या संशोधनाद्वारे सिद्ध झाल्याचे सांगितले जात आहे.


कोरोनाचा फैलाव दिवाळीपर्यंत नियंत्रणात येणार – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

First Published on: August 31, 2020 10:51 AM
Exit mobile version