‘कर्मचाऱ्यांनो ९ च्या आत ऑफिसात’; मुख्यमंत्र्यांचा आदेश

‘कर्मचाऱ्यांनो ९ च्या आत ऑफिसात’; मुख्यमंत्र्यांचा आदेश

सरकारी अधिकारी नेहमीच आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नसतात किंवा त्याच्या कामात कामचुकारपणा करत असतात, असे सहज ऐकायला मिळत असते. तसेच ते ऑफिसच्या वेळेवर न येता उशिरा येतात आणि वेळे आधीच निघून जात असल्याच्या तक्रारी नेहमीच सामान्य माणसं करत असतात. ऑफिस सुटण्याच्यावेळे पुर्वीच निघून जात असल्याने कामाकरिचा नागरिकांना ताटकळत बसावे लागते. याकरिता उत्तर प्रदेशातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपुर्वी नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याने अर्ध्या तासात जेवण उरकून कामावर हजर राहण्याचे आदेश, महाराष्ट्र सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांना दिले असून याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना कोणत्याही परिस्थितीत सकाळी ९ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यांच्यासह सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील या नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यास सांगितले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सरकारी आता ९ वाजेच्या आत कार्यालयामध्ये हजर राहणार आहे. जर ते वेळेवर पोहचले नाही तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी बजावले आहे.

First Published on: June 27, 2019 2:27 PM
Exit mobile version