डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असणाऱ्यांनाच मिळणार दारु

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असणाऱ्यांनाच मिळणार दारु

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असणाऱ्यांनाच मिळणार दारु

कोरोनाने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन केले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मद्यपानाच्या दुकानांना देखील टाळे ठोकले आहे. मात्र, मद्यपानाची दुकाने बंद असल्यामुळे केरळच्या मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विडयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल त्यांना दारु देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

५ दिवसात ५ तळीरामांनी केल्या आत्महत्या

केरळमध्ये लॉकडाउनमुळे तळीरामांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पाच दिवसात पाच तळीरामांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केरळ सरकारने नवा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये २८ मार्च रोजी मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आता केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी दारुचे व्यसन जडलेल्यांना दारु देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारु विक्री’, करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर दारुच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे, असेही म्हटले आहे. विशेष म्हणजे दारुच्या टंचाईमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, याकरता ऑनलाईन दारु विक्रीचा देखील पर्याय देण्यात आला आहे, असे देखील विजयन यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी


 

First Published on: March 30, 2020 1:25 PM
Exit mobile version