Uddhav Thackeray to meet Amit Shah : उद्धव ठाकरे अमित शहांची घेणार भेट, भेटीचे कारण ठरले

Uddhav Thackeray to meet Amit Shah : उद्धव ठाकरे अमित शहांची घेणार भेट, भेटीचे कारण ठरले

उद्धव ठाकरे अमित शहांची घेणार भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात या आठवड्याच्या अखेरीस भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे – अमित शहा यांच्यातील भेट ही अराजकीय असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या रविवारसाठी पहिल्या सत्रात अमित शहा यांची वेळ घेतली असल्याचे कळते. राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरी भागातील नक्षलवादाच्या विषयावरील ही भेट असल्याचे कळते. त्यासाठीच येत्या २६ सप्टेंबरला म्हणजे येत्या रविवारी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नक्षलवादाच्या विषयावर एकत्रित काम करण्याचा नियोजनाचा भाग म्हणून ही भेट होणार असल्याचे कळते. (Cm uddhav thackeray to meet amit shah to discuss issue of naxalism in maharashtras urban area)

महाराष्ट्रातील नक्षलवादाचा विषय तसेच राज्यातील मोठ्या शहरांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव यासारख्या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नागपूर या शहरांसाठी गुप्तचर यंत्रणांनी याआधीच अलर्ट दिला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून शहरी भागातील नक्षलवाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार आणि केंद्राला एकत्रितपणे या विषयावर काय करता येईल, यासाठीची चर्चा बैठकीत होईल असे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राची काय मदत गरजेची आहे, तसेच राज्य सरकार आणि केंद्राच्या समन्वयाच्या दृष्टीने या बैठकीकडे पाहिले जात आहे. नक्षलवादाचा विषय केंद्राच्या मदतीने कसा सोडवता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारचाही प्रयत्न आहे.

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यातील बैठकीनंतर त्यापाठोपाठच लगेचच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीच्या बाबतीत शक्यता आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात नक्षलवादाच्या समस्या देशपातळीवर उपाययोजनांसाठी ही बैठक असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीमुळेच लवकरच देशातील मुख्यमंत्र्याचीही बैठक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – ओबीसी आरक्षणावर आज मंत्रिमंडळाची बैठक, छगन भुजबळ यांची माहिती


 

First Published on: September 22, 2021 12:01 PM
Exit mobile version