CNG Price Hike : नागपुरात सीएनजीच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ

CNG Price Hike : नागपुरात सीएनजीच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ

पुणेकरांना दिलासा! CNG च्या दरांत मोठी घसरण

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या रोजच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहेत. एकीकडं पेट्रोल आणि डिझेल वाढत आहे, तर दुसरीकडं सीएनजीच्याही दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्रातील नागपुरात पुन्हा एकदा सीएनजी महाग झाला आहे. सोमवारी नागपुरात सीएनजीच्या किमतीत 3.50 रुपयांनी वाढ झाली त्यामुळं आता 1 किलो सीएनजीसाठी 115 रुपये मोजावे लागणार आहेत.

नागपूरात सीएनजीची किंमत 115 रुपये झाली आहे. म्हणजेच नागपुरात सीएनजीची किंमत पेट्रोलच्या जवळपास पोहोचली आहे. सध्या नागपुरात पेट्रोलचा दर 121.30 रुपये प्रतिलिटर आहे. याआधी 13 दिवसांपूर्वी सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपयांनी वाढ झाली होती.

दरम्यान, नागपुरात एलएनजी पाइपद्वारे पोहोचत नाही, तो गुजरातमधून रस्तामार्गे नागपुरात वाहून नेला जातो. त्यानंतर नागपुरात त्याचं सीएनजीमध्ये रूपांतर केलं जातं. त्यामुळं वाहतुकीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2021 मध्ये नागपुरात सीएनजीच्या किमतीने डिझेलच्या दराला मागे टाकलं होतं. आणि आताही सीएनजीची किंमत पेट्रोलच्या जवळपास पोहोचली असताना परिस्थिती अशीच होताना दिसत आहे. मात्र, गुजरातमधून एलएनजी आणण्यासाठी नागपुरात पाइपलाइन बांधण्यात येत असून, त्यानंतर नागपुरात सीएनजी थोडा स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात विकले जात आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटर आणि परभणी, महाराष्ट्रामध्ये 123.47 रुपये आहे. त्याचवेळी राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये आहे.

पेट्रोल डिझेलची दरवाढ अशी पाहा?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – सानपाड्यातील ‘त्या’ मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

First Published on: April 19, 2022 4:28 PM
Exit mobile version