उत्तर भारत थंडीनं गारठलं!

उत्तर भारत थंडीनं गारठलं!

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानुसार उणे ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. परिणामी दललेकच्या किनारी दोन इंचाचा बर्फाचा थर तयार झाला असून दल लेक परिसर बर्फाच्छादित झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

थंडीमुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान आज सकाळी आग्रा येथे धुक्याची चादर पसरली होती. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झालं होतं. दरम्यान बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आणि मुगल रोड सुद्धा बंद आहे. आग्रा येथे धुक्यासह थंड हवा वाहत आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. २८ आणि २९ डिसेंबर या दोन दिवशी आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीसोबतच धुक्याचं प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान वाढत्या थंडीमुळे दिल्ली सह नोएडामधील अनेक भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – मुंबईचा लोकल प्रवास महागणार?

First Published on: December 26, 2019 8:37 PM
Exit mobile version