पैरा कमांडो कर्नल संग्रामसिंह भाटी यांचे निधन

पैरा कमांडो कर्नल संग्रामसिंह भाटी यांचे निधन

पैरा कमांडो कर्नल संग्रामसिंह भाटी

भारतीय लष्काराचे धाडसी पैरा कमांडो कर्नल संग्रामसिंह भाटी यांचे आज निधन झाले. दिल्लीतील रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासून ते काविळीने त्रस्त होते. काविळ झाल्याने त्यांच्या शरीरीचे एक एक भाग निकामे होत चालले होते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीओकेमध्ये घुसून लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आणि अनेक स्पेशल ऑपरेशनचे नेतृत्व कर्नल संग्रामसिंह भाटी यांनी केले होते.

दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये घतला अखेरचा श्वास

जोधपूर येथील सेनेच्या स्पेशल फोर्स १० पैरा ‘डेजर्ट स्कोर्पियन’ चे कमांडिग ऑफिसर राहिलेल्या संग्रामसिंह भाटी यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते काविळीने त्रस्त होते. काविळीमुळे त्यांच्या शरीरीचे एक एक अवयव निकामे होत चालले होते. शेवटी दिल्लीच्या आरआर हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला

लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा

पाच वर्षापूर्वी संग्रामसिंह भाटी यांनी १० पैराच्या ब्लॅक ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. त्यांनी एलओसी पार करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याठिकाणी चार दिवस राहून त्यांनी लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवरुन श्रध्दांजली वाहिली आहे.

First Published on: October 20, 2018 2:32 PM
Exit mobile version