देशाच्या काही भागात कोरोना तीसऱ्या टप्प्यात; एम्सच्या डॉक्टरांनी केली चिंता व्यक्त

देशाच्या काही भागात कोरोना तीसऱ्या टप्प्यात; एम्सच्या डॉक्टरांनी केली चिंता व्यक्त

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक वाईट बातमी आली आहे. भारतातील काही भागात कोरोना संसर्ग तिसर्‍या टप्प्यात पोहोचला आहे. दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, काही भागात कोरोना समुदायातून पसरला आहे. तथापि, ते म्हणाले की कोरोना संपूर्ण भारतभरात दुसर्‍या टप्प्यात आणि तिसर्‍या टप्प्यात आहे. काही ठिकाणी प्रकरणं वाढली आहेत आणि मुंबईसारख्या काही भागात स्थानिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चिंताजनक आहे, असं दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले. आम्ही स्टेज २ ते ३ दरम्यान आहोत. भारतात बहुतेक ठिकाणी कोरोना केवळ स्टेज २ वर आहे.

डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले की, काही ठिकाणी कोरोना स्थानिक समुदायात पसरला आहे. परंतु आपण परिस्थितीवर ताबा मिळवला तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही ठिकाणी कोरोना स्थानिक समुदायात पसरत असल्यामुळे आता आपण अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. तबलीग जमातमुळे थांबलेला रोग थोड्या प्रमाणात वाढला आहे.


हेही वाचा – चीन सुधारणार नाही; इटलीने मदत म्हणून दिलेले पीपीई त्यांनाच विकतंय!

तबलीग जमातीतील लोकांच्या संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाईन व्हा

तबलीग जमातमुळे वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या प्रश्नावर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, या लोकांचा शोध घेणे आवश्यक आहे आणि जिथे जिथे गेले तेथे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाईन व्हा. जरी आपल्यामध्ये सौम्य लक्षणं असतील तरीही आपण घरीच राहणं महत्वाचं आहे.

कोरोना येथील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, डॉक्टर कोरोना विषाणूच्या कचाट्यात येत आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. डॉक्टरांच्या कुटूंबालाही कोरोना होऊ शकतो. लोकांनी डॉक्टरांना जास्त पाठिंबा द्यावा.

परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल

लॉकडाऊनच्या प्रश्नावर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, दहा दिवसानंतर अधिक डेटा येईल तेव्हा लॉकडाऊन वाढावे की नाही हे आपण सांगू शकू. परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल, कारण हा विषाणू जाणारा नाही.

 

First Published on: April 6, 2020 2:18 PM
Exit mobile version