दिल्लीत काँग्रेस, भाजपची खलबतं

दिल्लीत काँग्रेस, भाजपची खलबतं

काँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता काँग्रेस आणि भाजपची राजधानी दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण, सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण? यावर काँग्रेसमध्ये काहिसा संभ्रम पाहायाला मिळत आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी कबुली दिली आहे. तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासह सचिन पायलट देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या राजकारणाचा विचार करता कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण, त्यानंतर देखील नाराजी नाट्य उफळाून येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पक्ष नेतृत्वानं राजधानी दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे.

तर, दुसरीकडे भाजपनं देखील पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या धुरीणांची सभा राजधानी दिल्लीमध्ये बोलावली आहे. यामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी देखील हजर आहेत. यावेळी पक्षाला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबद्दल चर्चा होणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पराभवाची कारणं शोधली जाणार आहे. शिवाय, २०१९च्या लोकसभा देखील तोंडावर आल्यानं त्या दृष्टीनं देखील भाजप आता विचार करू लागला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भाजपनं आता खबरदारीची पावलं उचलायला सुरूवात केली आहेत. दरम्यान, पक्षाच्या पुढील वाटचालींबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.

First Published on: December 13, 2018 10:55 AM
Exit mobile version