Video : भरसभेत तरुणाने हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात लगावली

Video : भरसभेत  तरुणाने हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात लगावली

भरसभेत अज्ञाताने हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या कानाखाली खेचल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेत ही घटना घडली आहे. हार्दिक पटेल स्टेजवर भाषणासाठी उभे असताना अचानक स्टेजवर येऊन एका तरुणाने कानाखाली मारली. या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला मारहाण केली. याप्रकरणी हार्दिक पटेल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुजरातच्या सुरेंद्रनगरच्या बलदाना गावामध्ये हार्दिक पटेल यांची सभा सुरु होती. या सभेत भाषण सुरु असताना तरुण गुजर या तरुणाने हार्दिक पटेलच्या जोरात कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने भाजपच्या नेत्यावर चप्पल फेकून मारल्याची घटना घडली होती. भाजपचे नेते जीवीएल नरसिंह राव पत्रकार परिषदेत संबोधित करत असताना त्यांच्या दिशने चप्पल फेकून मारण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी या व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

याआधी देखील अनेक नेत्यांच्या कानशिलामध्ये मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रोड शो दरम्यान एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही असेच घडले होते. एका सभेतून ते बाहेर पडत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली होती. त्याधी भूपिंदर सिंह हुड्डा यांना पानीपत येथील एका रॅली दरम्यान एका तरुणाने कानाखाली मारली होती.

 

First Published on: April 19, 2019 11:36 AM
Exit mobile version