काँग्रेस नेते नवज्योत सिद्धूंची भाजपविरोधात ट्विटरवर टिवटिव

काँग्रेस नेते नवज्योत सिद्धूंची भाजपविरोधात ट्विटरवर टिवटिव

नवज्योत सिंह सिद्धू

भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाला सोडल्यानंतर सिद्धू भाजपा सरकारविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नसून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे भाजपाची सोशल मीडिया टीम त्यांना ट्रोल करत असते.

सिद्धूने हे केले ट्विट

नवज्योत सिंग सिद्धू ट्विटमध्ये म्हणतात, कोणताही घोटाळेबाज तुरुंगात गेला नाही. कोणाकडेही काळा पैसा सापडला नाही, तसेत गंगा स्वच्छ देखील झालेली नाही. सीमेवर शहिदांची संख्या कमी झालेली नाही. मोदी सरकार हे फक्त मोबाईलला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बनवण्यात आले आहे काय?, असा सवालही सिद्धू यांनी भाजपा समोर उपस्थित केला आहे. एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी एप्रिल फूल, तर पाच वर्षं मूर्ख बनवण्यासाठी कमळाचं फूल, असे म्हणत त्यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली आहे.

लोकतंत्राचे पहिलेच ट्रोलतंत्र

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधल्या संत कबीरनगरमध्ये भाजपा खासदार-आमदारांमध्ये झालेल्या खडाजंगीचा हवाला देत सिद्धू यांनी मोदींवर निषाणा साधला होता. एक व्हिडीओ प्रसिद्ध करत ते म्हणाले होते, मोदीजींची विनम्रता आणि विवेकाची परिभाषा, हीच आहे का देशाची आशा? लोकतंत्राचे पहिलेच ट्रोलतंत्र, लाठीतंत्र, भयतंत्र पाहिलं होतं. आता खासदार महोदयांनी बूटतंत्रही आणले आहे. बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान – अल्लाह, असेही म्हणत सिद्धू यांनी भाजपावर टीका केली होती.


वाचा – नवज्योत सिंग सिद्धूची ‘ती’ मिठी आणि वाद

वाचा – सिद्धूला पुन्हा घ्या; टीआरपीसाठी सलमानची मागणी


 

First Published on: March 13, 2019 2:29 PM
Exit mobile version