गुजरातमध्ये काँग्रेस का हरली, जबाबदार कोण? पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईलींनी दिले स्पष्टीकरण

गुजरातमध्ये काँग्रेस का हरली, जबाबदार कोण? पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईलींनी दिले स्पष्टीकरण

भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा ऐतिहासित विजय मिळवला आहे. भाजपने आपल्या होमपिचवर सलग सातव्यांदा विजय मिळवला. भाजपाच्या या विजयानंतर गुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवावर पक्षाचे ज्येष्ठ नेते एम वीरप्पा मोईली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव का झाला? याला जबाबदार कोण? या सर्व प्रश्नांचे उत्तरही त्यांनी दिले. (Congress Letting Gujarat Leaders Down Led To Poll Debacle, Says M Veerappa Moily)

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिल्याने राज्यातील स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्याचे एम वीरप्पा मोईली म्हणाले. शिवाय, “ज्या नेत्यांनी याआधी यश मिळवले त्यांचा काँग्रेसने नेहमीच आदर केला पाहिजे. तसेच, माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांची पीसीसी प्रमुखपदी नियुक्ती केल्याने हिमाचल प्रदेशला फायदा झाला. त्यानुसार, पक्षातील सर्व जुन्या आणि तरुण नेत्यांची काळजी घेतली पाहिजे. गेल्या निवडणुकीत ज्या नेत्यांनी भरीव योगदान दिले त्यांना आपण विसरणे योग्य नाही”, असेही एम वीरप्पा मोईली यांनी सांगितले.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना एम वीरप्पा मोईली म्हणाले की, “भूतकाळात पारखलेल्या नेत्यांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस उदयास येऊ शकते. जे आपण गुजरातमध्ये केले नाही”. तसेच, “गुजरातमध्ये नेते निराश झाले आहेत आणि परिस्थिती सुधारलेली नाही. हा शिकण्यासारखा धडा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि निरीक्षक हे राज्याच्या नेत्यांवर लादू नयेत, त्याऐवजी त्यांना सशक्त केले पाहिजे, त्यांचे पालनपोषण केले पाहिजे आणि त्यांना योग्य मान्यता दिली पाहिजे जेणेकरून ते नेहमी पक्षासाठी काम करू शकतील”, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणाले.

जुन्या नेत्यांना डावलणे ही मोठी चूक

मागील वेळी गुजरातमध्ये काँग्रेसला खूप चांगले निकाल मिळाले होते. ज्यामध्ये काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा मागील वेळी पक्षासाठी मोलाचे योगदान दिलेल्या नेत्यांना हटवण्यात आले आणि इथेच मोठी चूक झाली. त्यांच्या मदतीने परिस्थिती सुधारता आली असती, पण तसे झाले नाही. 2022 च्या गुजरात विधानसभेत काँग्रेसला केवळ 17 जागा मिळाल्या, ही एक प्रकारे चांगली परिस्थिती नाही.


हेही वाचा – ‘आपने गुजरातमध्येही खेळ खराब केला आणि…’ पराभवानंतर पी. चिदंबरांचा केजरीवालांवर ठपका

First Published on: December 11, 2022 6:55 PM
Exit mobile version