राज्यसभेच्या सभापतींची तक्रार सभापतींकडेच

राज्यसभेच्या सभापतींची तक्रार सभापतींकडेच

एम वेंकैया नायडू

काँग्रेस पक्षाचे आसाममधील राज्यसभा सदस्यांनी राज्य सभेच्या सभापती एम वेंकैय्या नायडू यांच्या विरोधात तक्रारपत्र लिहिले. मात्र हे पत्र त्यांनी वेंकैय्या नायडूंनाच लिहिले असल्याची वेगळीच घटना समोर आली आहे. राज्य सभेत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो त्यामुळे सभापती भेद-भाव करत असल्याची तक्रार खासदारांनी या पत्रात केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनसीआर) यादीचा आसाम राज्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर चर्चा सुरु असतानां बोलू न दिल्यामुळे त्यांनी राग व्यक्त केला. कँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी हे पत्र लिहून पाच काँग्रेस पक्षातील सदस्यांची त्यावर स्वाक्षरी घेतली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ही आसाम क्षेत्रातून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी या अद्वितीय निषेध आंदोलनाचा भाग होण्याचे टाळले.

राज्य सभेत काँग्रेस सदस्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषण पूर्ण होऊ दिले नाही. काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गोंधळाची नायडूयांनी निंदा केली. तसेच त्यांना शांत बसून शहां यांचे भाषण ऐकण्यास सांगितले. “आसाममधील आत्मसमर्पणाच्या मुद्द्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केली होती. काँग्रेसने २००५ साली एनसीआर यादी जाहीर केली होती मात्र त्याला यश मिळू शकलं नाही. वोट बँक वाचवण्यासाठी बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई केली नाही.” असे वक्तव्य अमित शाह यांनी केले. माजी पंतप्रधानांचा अपमान केल्यामुळे शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली. यापुढे शाह यांना बोलू दिले नाही म्हणून सभागृहात गोंधळ करण्यात आला. नायडू यांनी विरोधी पक्षाला थांबवले व शाह यांना बोलण्यास सांगितले. आसाम प्रश्नाबद्दल चर्चा करण्यास त्यांनाही वेळ दिला जाणार असल्याचे नायडू यांनी सांगितले. त्यावेळी ४० लाख लोकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आम्हाला बोलू द्या अशी मागणी काँग्रेस सदस्यांकडून करण्यात आली. मात्र सभापतींनी काँग्रेसचे म्हणने ऐकले नाही. म्हणून आसाम मधील काँग्रेसचे खासदारांनी याची तक्रार करण्याचे ठरवले आणि सभापती संबधी असलेली तक्रार सभापतींनाच केली.

First Published on: August 2, 2018 10:36 PM
Exit mobile version