कर्नाटकातील जागावाटपावर राहुल गांधी – देवेगौडा यांची चर्चा

कर्नाटकातील जागावाटपावर राहुल गांधी – देवेगौडा यांची चर्चा

राहुल गांधी आणि देवेगौडा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज, बुधवारी सकाळी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जागावाटपाच्या चर्चेच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीमध्येही दोन्ही पक्षाची कर्नाटकात आघाडी असणार आहे. त्यासाठी राज्यातील जागावाटपाचा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याच्या दृष्टीने आजची भेट महत्वाची ठरत आहे.

मोदी सरकारला हरवण्यासाठी एकजूट 

राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी सर्वच समविचारी पक्षांना बरोबर घेऊन मोदी सरकारला एकजुटीने टक्कर देण्याच्या तयारीत विरोधक आहेत. महाआघाडीच्या रुपाने या पक्षांची एकमूठ बांधण्यासाठी राहुल गांधी स्वतः प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते स्वतः विविध पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत आघाडीमध्ये दगाफटका होणार नाही याची काळजी ते जातीने घेत असल्याचे दिसते. त्याचाच एक भाग म्हणून आजची ही भेट मानण्यात येत आहे.

हेही वाचा –

किती डास मारले ते मोजू का? – व्ही.के.सिंग

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका; केली कोंडी

‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी

First Published on: March 6, 2019 12:25 PM
Exit mobile version