दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेसचा एल्गार, ‘संकल्प सत्याग्रह’साठी प्रियांका गांधी राजघाटावर, मोठा फौजफाटा तैनात

दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेसचा एल्गार, ‘संकल्प सत्याग्रह’साठी प्रियांका गांधी राजघाटावर, मोठा फौजफाटा तैनात

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, निवडणूक आयोगाने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

Congress Sankalp Satyagraha: राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज (रविवारी) देशभरात संकल्प सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं आहे. सकाळी १० वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि विभाग स्तरावरील कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात हे आंदोलन केलं जात आहे. दिल्लीत काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते महात्मा गांधी यांच्या समाधी राजघाटावर पोहोचले आहेत. दिल्लीतील राजघाटावरील सत्याग्रहाला कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थिती लावली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आज महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय सत्याग्रह करत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत एकजूट दाखवत सर्व राज्य आणि जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांसमोर हा ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात येत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. दिल्लीतील राजघाटावरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेसचे बडे नेते आणि कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. आंदोलनापूर्वी महात्मा गांधींचे आवडते भजन वैष्णवजन गायले गेले. दिल्लीतील राजघाटावरील सत्याग्रहाला पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित आहेत. राजघाटावर पोहोचल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केलं.

प्रियंका गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, पी चिदंबरम आणि सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेतेही राजघाटावर पोहोचले आहेत.

दुसरीकडे राजघाटावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. खरं तर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला राजघाटावर जमण्यास परवानगी दिलेली नाही. असं असतानाही राजघाटावर काँग्रेस नेत्यांची गर्दी जमली आहे. “जेव्हा राहुल गांधींना दबावात आणण्यासाठी मानहानीचा तमाशा करत आहेत…. हे एक षड्यंत्र आहे. ज्याच्या विरोधात राहुल गांधी लढत आहेत. संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केलीय.

First Published on: March 26, 2023 11:49 AM
Exit mobile version