न्या. एस मुरलीधर यांची बदली हे भाजपचे षडयंत्र – सुरजेवाला

न्या. एस मुरलीधर यांची बदली हे भाजपचे षडयंत्र – सुरजेवाला

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला

भाजप पक्ष हा अजुनही २०१९ च्या विजयाच्या नशेत आहे. ज्याठिकाणी न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून संविधानाच्या बाजुने निर्णय़ दिले गेले, मानवी हक्कांचे रक्षण करण्यात आले, सरकारविरोधी निर्णय गेले अशा सगळ्या प्रकरणात न्यायमूर्तींची बदली करण्यात आली किंवा त्यांना हटवण्यात आले. भाजप सरकारने बदल्याच्या भावनेने या बदल्या केल्या आहेत. दिल्ली निवडणुकीत प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात गुन्हा का नोंदवला नाही अशी विचारणा करणाऱ्या न्यायमूर्ती एस मुरलीधर यांचीही बदली बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. या बदलीला आक्षेप घेत कॉंग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या अशा कामकाजावर निशाणा साधला आहे. मुरलीधरांच्या बदलीला त्यांनी यावेळी विरोध केला आहे.

न्या. एस मुरलीधरन बदलीची नोटीस

अमित शहा यांना कारावास घडवणाऱ्या न्यायाधीशांचेही हाल 

न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या बदलीनंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उडवण्यास सुरूवात केली आहे. सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे करत याआधी झालेल्या न्यामूर्तीच्या झालेल्या बदल्यांचाही खुलासा केला आहे. अमित शहा यांना कारावास घडवणाऱ्या न्यायमूर्तींचे कशा प्रकारे हाल करण्यात आले याचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. उत्तराखंड येथे भाजपकडून लागू करण्यात राष्ट्रपती राजवटीचा निर्णय कसा चुकीचा होता यावर जेव्हा न्यायालयाने निर्णय़ दिला तेव्हा त्या न्यायाधीशांचीही अशाच पद्धतीने रवानगी करण्यात आली असे सूरजावाला यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत त्या न्यायाधीशांना नियुक्ती देण्यात आली नाही असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. भारतीय जनता पक्षाच हे सुनियोजित षडयंत्र असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

First Published on: February 27, 2020 10:47 AM
Exit mobile version