पंतप्रधान मोदींबद्दल काँग्रेसने केला ‘हा’ मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींबद्दल काँग्रेसने केला ‘हा’ मोठा खुलासा

राहुल गांधींची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. पत्रकार परिषद सुरु करतानाच त्यांनी मोदींवर टीका केली. चौकीदार की जमीनदार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोदींनी आपल्या संपत्तीबाबत खोटी माहिती दिली, असा गंभीर आरोप खेरा यांनी केली आहे. याशिवाय निवडणूक आयोग आता नरेंद्र मोदीं विरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गुजरातमध्ये २००० सालानंतर आमदार, खासदार, सरकारी अधिकारी कुणालाच भूखंड दिला गेला नाही, असं भाजप खासदार मिनाक्षी लेखींनी कोर्टात सांगितलं होतं, असे काँग्रेसने म्हटले होते. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा म्हणाले की, ‘सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत सुप्रीम कोर्टात एका व्यक्तीने जनहिर्थ याचिका दाखल केली आहे. ही जनहीत याचिका नरेंद्र मोदींच्या गांधीनगर येथील संपत्ती संदर्भात आहे. मोदींनी याबाबत लपवलं आहे. कारण २००२ नंतर मंत्री बनल्यानंतर त्यांना ही जागा खरेदी केली आहे. २००७ च्या निडणुकीवेळी नरेंद्र मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली होती. २००७ साली मोदींनी गांधीनगरच्या सेक्टर ‘ए’ मधील प्लॉट नंबर ४११ विकत घेतला होता. त्यावेळी त्यांनी अनुदानाच्यामार्फत १ लाख रुपये भरुन ती जागा घेतली होती. आज त्या जागेची किंमत १ कोटी १८ लाख एवढी आहे. २००७ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितलं होतं की, त्यांनी त्या विकत घेतलेल्या जागेवर ३० हजार ३६३ रुपये खर्च करुन बांधकाम केले.’

‘मात्र, २०१२ च्या निवडणुकवेळी मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्या जागेविषयी काहीच माहिती दिली नाही. विशेष म्हणजे ती संपत्ती सरकारी अनुदानात घेतल्यामुळे ते ती संपत्ती विकूही शकत नाहीत. त्या संपत्तीला जर भाड्याने द्यायचे जरी असले तरी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. परंतु, या ४११ नंबरच्या फ्लॅटचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात झाला नाही. त्या फ्लॅट नंबरच्या जागेवर आला गांधीनगरच्या ए सेक्टर येथीस ४०१ नंबरच्या प्लॉटचा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी या जागेचा एक चतुर्थांश भाग माझ्या मालकीचा आहे.’

‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुन्हा गांधीनगरच्या ए सेक्टरमधील ४०१ जागेच्या संपत्तीविषयी नमूद केले होते. आपण या जागेच्या एक चतुर्थांश भागाचे मालक आहोत, असेही मोदींनी पुन्हा नमूद केले. ही जागा ३२६. ११ चौ.फुट क्षेत्रफळाची आहे असेही त्यांनी नमूद केले.’

‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी एक नवा नियम लागू केला होता. या नियमानुसार एक वेबसाईट चालू करण्यात आली होती. त्या वेबसाईटवर सत्तेवर येणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती टाकणे जरुरीचे आहे. त्याच नियमानुसार मोदींनी ३१ मार्च २०१८ रोजी वेबसाईटवर आपल्या संपत्तीची नोंद केली. त्यामध्ये देखील त्यांनी ३२६. ११ चौ.फुट क्षेत्रफळाचे गांधीनगरच्या ए सेक्टरमधील ४०१ क्रमांकाच्या जागेच्या संपत्ती विषयी माहिती टाकली. त्यासोबत या जागेता एक चतुर्थांश भागाचा मालक आपण असल्याची माहिती त्यांनी टाकली.’

‘आता या जागेसंदर्भात गांधीनगरमध्ये चौकशी सुरु झाली. या चौकशीत समोर आले की, गांधीनगरच्या ए सेक्टरमध्ये  ४०१ पत्त्याची कुठलीही जागा गांधीनगरमध्ये अस्तित्त्वात नाही. मात्र, ४११ ‘ए’ पत्त्याची जागा आहे. ही जागा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावावर आहे.’

‘राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अरुण जेटली यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपण ४०१ ‘ए’ या जागेचे एक चतुर्थांस भाग मालक आहोत, असे म्हटले आहे. या जागेसंदर्भात मोदींनी २००७ च्या प्रतिज्ञापत्रात आपल्या हक्काचे असल्याचे म्हटले होते.’

‘जेटली सांगतात की गांधीनगरच्या मामलेदारांनी त्यांना ही जागा दिली होती. त्या काळात जागावाटपची वेगळी लाट आली होती. सरकारी अधिकारी आणि भाजप पक्षाच्या नेत्यांना जागा देण्यात आली होती. त्यामध्ये जेटलीदेखील होते. जेटली ज्या जागेचा मालकी हक्क सांगतात त्या जागेची किंमत १ कोटी १९ लाख इतकी आहे.’

‘मात्र, जेव्हा ते अर्थमंत्री झाले तेव्हा वेबसाईटवर त्या जागेविषयी माहिती मिळत नाही. ती माहिती गाळण्यात आली आहे.’

‘जेव्हा काही पत्रकार गांधीनगरच्या महसूल विभागात जातात तेव्हा नरेंद्र मोदी ४११ ए चे मालक आणि अरुण जेटली ४०१ ए चे मालक असल्याची माहिती मिळते.’

First Published on: April 16, 2019 3:57 PM
Exit mobile version