तिहेरी तलाकवर पक्षाची भूमिका स्पष्ट- सोनिया गांधी

तिहेरी तलाकवर पक्षाची भूमिका स्पष्ट- सोनिया गांधी

सोनिया गांधी

तिहेरी तलाक संदर्भातले विधेयक आज राज्यभेत मांडले जाणार आहे. सत्ताधारी भाजप पक्षाने या कायद्यात बदल सुचवले होते. पण यातील काही बदलांना काँग्रेसने विरोध दर्शवला होता. आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी तिहेरी तलाक संदर्भातील तरतुदींसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘तिहेरी तलाक संदर्भातील पक्षाची भूमिका स्पष्ट आहे’ असे सांगितले. काँग्रेसने दोषी पतीला अटक आणि त्यानंतर तीन वर्षे शिक्षेला विरोध दर्शवला होता. पतीला जामीन मिळण्याची मागणी विधेयकामध्ये केली होती. काल केंद्राकडून याला मंजूरी देखील मिळाली.

वाचा- तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

तिहेरी तलाक संदर्भात काँग्रेसची भूमिका

सत्ताधारी भाजपने तिहेरी तलाक संदर्भातील मुस्लिम महिला विवाह विधेयक लोकसभेत मांडले. गदारोळानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. पण राज्यसभेत हे विधेयक अडकले. विधेयकातील काही तरतुदींवर काँग्रेसने विरोध दर्शवला होता. तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणाऱ्या पतीला अटक करण्यावर आक्षेप घेतला होता.शिवाय तीन वर्षांची शिक्षाही मंजूर नव्हती. असे करणे स्त्री- पुरुष भेदभाव करण्यासारखे आहे. त्यामुळे जामीनाची मागणी केली होती. काल केंद्राने याला मंजूरी दिली.

वाचा- सहा महिन्यात तिहेरी तलाक कायद्यात बदल होणार

आता काँग्रेसने विरोध करु नये

काँग्रेसने सुचवलेले बदल मान्य केल्यानंतर आता तरी या विधेयकाला राज्यसभेत काँग्रेसने विरोध करुन नये, असे कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद म्हणाले आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज हे विधेयक मंजूर झाले तर हा कायदा अंमलात आणण्यास मदत होईल असे रवि शंकर प्रसाद म्हणाले.

First Published on: August 10, 2018 3:31 PM
Exit mobile version