पेरियार यांच्याविषयी वादग्रस्त विधान

पेरियार यांच्याविषयी वादग्रस्त विधान

रजनीकांत यांच्याविरोधात संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेल्या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. १९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते, असे रजनीकांत म्हणाले होते.

यावरून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असून गुन्हाही दाखल झाला आहे.त्या विधानाविषयी माफी मागण्याची मागणी होत असताना रजनीकांत यांनी नकार दिला आहे. पेरियार यांच्याविषयी मी जे वक्तव्य केले आहे, ते अगदी खरे आहे. अनेक माध्यमांमध्ये ते प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही, अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे.

मागील आठवड्यात तुघलक या तामिळ मासिकाला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना रजनीकांत यांनी ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी वक्तव्य केले होते. १९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते, असे रजनीकांत यांनी सांगितले. त्याच्या या विधानावर द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेने आक्षेप घेत निदर्शन सुरू केले आहेत.

First Published on: January 22, 2020 5:51 AM
Exit mobile version