कोरोनाची लहानग्यांवर वक्रदृष्टी, मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? पालकांमध्ये संभ्रम

कोरोनाची  लहानग्यांवर वक्रदृष्टी, मुलांना शाळेत पाठवायचं की नाही?  पालकांमध्ये संभ्रम

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असून राजधानी दिल्ली आणि इतर राज्यात शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. यामुळे पालकांमध्ये धास्तीचे वातावरण असून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा संभ्रम पालकांना पडला आहे.

तर नोएडामधील काही शाळांनी मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा वाढता धोका ओळखत  पुन्हा हायब्रिड मोडमध्ये शिक्षण सुरू  करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा ऑफलाइन सुद्धा चालू असतील. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे नाही त्यांना आम्ही ऑनलाइन शिक्षण देऊ.  जे पालक आपली मुलं शाळेत पाठवतील, त्यांना आम्ही ऑफलाइन शिक्षण देऊ. असे शाळांकडून सांगण्यात येत आहे.

नोएडामध्ये कोरोनाचे २४ तासात १०७ रूग्ण
नोएडामध्ये आज कोरोना रुग्णांचे आकडे १०० च्या पलीकडे पोहचले आहेत. तसेच मंगळवारी १०७ रूग्ण सापडले आहेत. सध्या ४११ रूग्ण सक्रिय असून ३२ रूग्ण बरे झाले आहेत. मुलांमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अनेक संघटनांनी लहान मुलांच्या शाळा बंद करण्याची मागणी केली आहे.

मुलांना सर्दी-खोकला झाल्यास शाळेत पाठवू नका
मुलांमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणामुळे नोएडामधील अनेक शाळा बंद करण्यात आल्या. मुलांसह शाळेतील शिक्षक सुद्धा पॉजिटिव सापडल्याने, गाजियाबादमधील अनेक शाळा आता पुन्हा काही दिवस ऑनलाइन सुरू करण्यात आल्या. खरंतर  नुकत्याचं काही दिवसांपूर्वी शाळा सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र आता ऐन परिक्षांच्या दिवसात पुन्हा शाळा बंद कराव्या लागत आहेत.

 

First Published on: April 19, 2022 5:38 PM
Exit mobile version