भयंकर! मृत्यूच्या १५ महिन्यानंतर सापडले कोरोना रुग्णांचे शव

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहील्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. यामुळे रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड झाल्याचे समोर आले होते. पण बंगळुरू येथील राजाजीनगर ईएसआय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सच्या बेजबाबदार कारभारामुळे मृत्यूनंतरही रुग्णांचे हाल झाले. येथे दोन कोरोना रुग्णांचे शव तब्बल पंधरा महिने शवागृहात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.यातील एक मृत व्यक्ती महिला असून दुर्गा (४०) असे तिचे नाव आहे तर दुसरा मृतदेह मुनिराजू (३५) नावाच्या व्यक्तीचा आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्याने दुर्गा आणि मुनिराजू या दोघांना ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचे निधन झाले. कोवीड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी त्यांचे मृतदेह बीबीएमपीकडे सोपवण्यात आले होते.

त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामृतांचा आकडा वाढल्याने जुने शवागर अपुरे पडले. यामुळे ईआयएसने तातडीने दुसरे शवागृह उभारले. यामुळे जुन्या शवागृहाचा वापर कमी झाला. यादरम्यान, जुन्या शवागृहाची साफसफाई करताना बर्फात ठेवलेले दुर्गा आणि मुनिराजू यांचे मृतदेह सफाई कर्मचाऱ्यांच्या सापडले. या घटनेनंतर बंगळुरूमध्ये रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर दुर्गाच्या पतीचेही कोरोनामुळे निधन झाले असून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. तर मुनिराजू याच्या कुटुंबियांचा ठावठिकाणा लागत नसल्याने या दोघांच्या मृतदेहावर सरकारी अधिकारी अंत्यसंस्कार करणार आहेत.

First Published on: November 29, 2021 4:19 PM
Exit mobile version