Coronavirus: देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार! २४ तासात ६२,५३८ नवे रूग्ण

Coronavirus: देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार! २४ तासात ६२,५३८ नवे रूग्ण

देशातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली, जी आजपर्यंत एकाच दिवसात कधी झाली नव्हती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेली ६२ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, जे एका दिवसात करण्यात आलेली रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे. त्यामुळे देशभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या २० लाख २७ हजार ०७५ वर गेली आहे.

तसेच देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात या प्राणघातक विषाणूमुळे ४१ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे ८८६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत देशभरात या कोरोनामुळे ४१ हजार ५८५ मृत्यू झाले आहेत.

परंतु गेल्या २४ तासांत ४९ हजाराहून अधिक लोकही बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत देशभरात एकूण ४९ हजार ७६९ लोकं कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत देशभरात एकूण १३ लाख ७८ हजार १०६ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या कोरोनाचे ६ लाख ७ हजार ३८४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

२४ तासांत ५ लाख ७४ हजारांहून अधिक चाचण्या

दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ५ लाख ७४ हजार ७८३ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशात आतापर्यंत २ कोटी २७ लाख २४ हजार १३४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


Corona Vaccine : दिलासा! रूसची वॅक्सीन १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते

First Published on: August 7, 2020 10:25 AM
Exit mobile version