Live Update : सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर

Live Update : सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर
सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर
मुंबईत आज कोरोनाचे 202 नवे रुग्ण, तर शून्य मृतांची नोंद   केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्या पत्रकार परिषद
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व कन्या आज्ञा नाईक यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कुटुंबाची बदनामी होत असल्याची तक्रार त्यांनी केली, तसेच गृहमंत्र्यांकडे कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.

सोमय्यांविरोधात सुनील राऊत यांचे पवई पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाणे-दिवादरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गाचं उद्धाटन मुंबईत मेट्रोचा देखील विस्तार होतोय- पंतप्रधान मोदी
19 बंगल्यांचं रहस्य अधिक वाढलेय- किरीट सोमय्या
इक्बाल कासकरला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यात मुल्सीम तरुणींचा हिजाबच्या समर्थनार्थ एल्गार
राज्यातल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज फोनवरून झाली चर्चा
कर्नाटक हायकोर्टात हिजाब वादा प्रकरणी सुनावणी झाली सुरू
रेवंदडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या दाखल, १९ बंगले गायब झाल्याची तक्रार करणार दाखल
किरीट सोमय्या आता रेवदंडा पोलीस ठाण्याकडे रवाना
किरीट सोमय्यांच्या गाडीचा ताफा कोर्लई ग्रामपंचायतून निघाला
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर
कोर्लई ग्रामपंचायत परिसरात शिवसेना-भाजप आमने-सामने
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दाखल
कोर्लईत तणावचे वातावरण
भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लईत दाखल
एसी लोकल पायलट मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंच्या भेटीला.
गायिका वैशाली भैसने-माडे यांच्या हत्येचा रचला जात असून जीवाला धोका असल्याची भीती फेसबूक पोस्ट द्वारे व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचे वैशाली यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे.
काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे. Posted by Vaishali Bhaisane on Thursday, February 17, 2022
 
मुंबई, पुण्यात काँग्रेसचे आंदोलन, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेत काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नी सुधीर जोशींचे अंत्यदर्शन घेतले. थोड्याच वेळात सुधीर जोशींवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
२६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ दोषींना फाशीची शिक्षा
मनी लाँड्रिंग प्रकरण इक्बाल कासकरविरोधात ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता, आज ईडी कार्यालयात आणण्याची शक्यता
थोड्याच वेळात किरीट सोमय्या कोर्लईत पोहोचणार
देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ९२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४९२ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ६६ हजर २५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात २ लाख ९२ हजार ९२ सक्रीय रुग्ण आहेत.
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसैनिक मोठा गोंधळ घालण्याची शक्यता. त्यामुळे कार्लईत पोलिसांचा फौजफाटा तैनात
भाजप नेते किरीट सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात १९ बंगल्यांची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. आता ते मुंबईतून कोर्लकडे रवाना झाला आहेत.
गोव्यातील १ली ते १२वीपर्यंतचे वर्ग २१ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ठाणे आणि दिवा येथून अतिरिक्त उपनगरीय सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सामील होतील.  
First Published on: February 18, 2022 8:44 PM
Exit mobile version