कोरोना काळात डायरिया आणि सेप्सिसमुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यू, कुपोषणाचे प्रमाण घटले

कोरोना काळात डायरिया आणि सेप्सिसमुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यू, कुपोषणाचे प्रमाण घटले

Corona Third Wave : तिसरी लाट आली? महिन्याभरात सर्वाधिक मुलांना कोरोनाची लागण

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी नागरिकांचा बळी कोरोनाने बळी घेतला. अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग अद्यापही सुरु आहे. भारतातही कोरोनाच्या डेल्टा प्लस कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. कोरोनामुळे बिघडलेल्या आरोग्य यंत्रणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM)च्या माहितीनुसार, २०२० ते २०२१ या कोरोना काळात देशात डायरिया आणि सेप्सिस आजारांमुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. ६५ टक्के निमोनिया, ६२ टक्के अस्थमा आणि ४४ टक्के सेप्सिसचे रुग्ण रुग्णालयात पोहचू शकले नाहीत. मात्र रुग्णालयात भर्ती झालेल्या कुपोषित रुग्णांचे प्रमाण ५३ टक्क्यांनी कमी झाले आहे. यातील पाच टक्के मृत्यू हे शहरी भागांत झालेत. तर ग्रामीण भागांतील रुग्णालयात ५९ टक्क्यांहून कमी मृत्यू नोंदवण्यात आले.

दीड वर्षांत मृतांचे प्रमाण घटले

जानेवारी २०२० मध्ये निमोनियामुळे ५६४९७ बालके रुग्णालयात भर्ती झाले. तर मार्चमध्ये ३९९४९ आणि एप्रिलमध्ये ११,३४९ लहान मुले रुग्णालयत दाखल झाले होते. २०२१ मध्ये ही संख्या वाढून २०६७९ झाली होती. मात्र मेमध्ये हीच रुग्णसंख्या कमी होत १०,८४४ पर्यंत खाली पोहचली.

मृत्यूदर कोरोनाहूनही अधिक

निमोनिया आजारामुळे होणारा मृत्यूदर कोरोनाहूनही अधिक आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान डायारियमुळे १२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. या आजारांमध्ये ५० टक्क्यांहून जर कमी रुग्णांची नोंद होत असली तरी मृतांची संख्याही वाढतेय.

२६७ टक्के वाढले मृतांचे प्रमाण

शहरी भागातील १ ते ५ वयोगटातील २६७ टक्क्यांहून अधिक बालकांचा या आजारापणामुळे मृत्यू झाला.


 

First Published on: August 13, 2021 6:09 PM
Exit mobile version