दिलासादायक: कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत आहेत; रिकवरी रेट २५ वर – आरोग्य मंत्रालय

दिलासादायक: कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत आहेत; रिकवरी रेट २५ वर – आरोग्य मंत्रालय

लव अग्रवाल सहसचिव, आरोग्य मंत्रालय

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आरोग्य व गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. देशात मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाने बरे होत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. गेल्या २४ तासात देशात ६३० लोक बरे झाले आहेत. सध्या टोटल रिकव्हरी रेट २५.१८ टक्के आहे. हा रेट सतत वाढत आहे. हे एक सकारात्मक लक्षण आहे. ७८ टक्के मृत्यूंमध्ये मृत व्यक्तींना इतर अनेक आजार होते. देशाचा डबलिंग रेट ११ झाला आहे.

पुढे म्हणाले की, गेल्या २४ तासांत १७८० नवीन प्रकरणे नोंदली गेली. एकूण कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे ३३०५० आहेत, त्यापैकी सक्रिय कोरोनाची प्रकरणे २३६५१ आहेत. आतापर्यंत एकूण ८३२४ रुग्ण बरे झाले आहेत. ते म्हणाले की, जोपर्यंत टेस्टिंग प्रोटोकॉलचा प्रश्न आहे, आम्ही केवळ आरटी-पीसीआर चाचणी घेत आहोत.


हेही वाचा – आता लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी मिळणार, वाचा काय आहेत नियम!


इतर राज्यांत जाणाऱ्या लोकांची तपासणी केली जाणार

इतर राज्यांत जाणाऱ्या लोकांची तपासणी केली जाईल, बसमध्ये सामाजिक अंतराची काळजी घेतली जाईल. बस पूर्णपणे सॅनिटाईझ केली जाईल. पोहोचल्यावर आरोग्य तपासणी होईल. कोणतीही लक्षण न आढळल्यास, घरात १४ दिवस क्वारंटाईन केलं जाईल. आरोग्य चाचण्या वेळोवेळी केल्या जातील, असं गृह मंत्रालयाचे प्रवक्ते आणि सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं.

 

First Published on: April 30, 2020 5:07 PM
Exit mobile version