कोरोनाग्रस्तांनी लावली लग्नाला हजेरी; ५०० जणांना केलं होम क्वारंटाईन

कोरोनाग्रस्तांनी लावली लग्नाला हजेरी; ५०० जणांना केलं होम क्वारंटाईन

प्रातिनिधिक छायाचित्र

पश्चिम बंगालमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यात १५ मार्च रोजी झालेल्या लग्नाच्या कार्यक्रमाला ३ कोरोनाग्रस्तांनी हजेरी लावली. यामध्ये दोन वयोवृद्ध व्यक्ती होत्या. या लग्नाला ५००हून अधिक लोकांनी हजेरी लावली. मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग असल्याने ही घटना ‘चिंताजनक’ असल्याचे जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यासर्वांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. लग्नाला हजेरी लावणाऱ्यांपैकी वराच्या वडिलांचे चार मित्र जे यूके आणि सिंगापूरहून आले होते.

लग्नानंतर २५ मार्च रोजी एका ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन कुटूंबातील कमीतकमी १३ जणांना शासनाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ५६ वर्षीय वराची आई आणि त्यांच्या ७६ वर्षीय मावशी २८ मार्च रोजी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. ७६ वर्षीय महिला नरेंद्रपूर येथील रहिवासी आहे. आरोग्य अधिकारी ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाव्हायरस कसा झाला या विवंचणेत आहेत.


हेही वाचा – Coronavirus: क्वारंटाईन व्यक्तीने घेतला महिलेचा चावा; महिलेचा मृत्यू


आरोग्य अधिकारी अद्याप या विषाणूच्या प्रसाराचे स्रोत शोधू शकलेले नाहीत. वराचे वडीलही क्वारंटाईन आहेत. “आम्ही १३ लोकांचे स्वॅब नमुने सरकारी प्रयोगशाळांना पाठवले होते. दोघांची चाचणी पॉझिटीव्ह आली तर इतरांची निगेटीव्ह आली आहे. इतर काही लक्षणे दिसल्यास आम्ही चाचण्यांसाठी अधिक नमुने पाठवू,”असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. यजमान कुटूंबाकडून निमंत्रितांची यादी गोळा करण्यात आली असून लोकांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी निती चंद्र मंडळ यांनी सांगितले.

रिसेप्शनला उपस्थित राहणाऱ्या ५००हून अधिक लोकांना रूग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र, आतापर्यंत त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 

First Published on: March 29, 2020 1:01 PM
Exit mobile version