भयंकर! कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरने विनामास्क रूग्णाला तपासले अन् …

भयंकर! कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरने विनामास्क रूग्णाला तपासले अन् …

प्रातिनिधीक फोटो

उत्तरप्रदेशात कोरोना संसर्ग वेगाने होत असून चित्रकूटमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी फैलण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात द्वारकापुरीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरने आपला दवाखाना सुरुच ठेवला आणि अनेकांवर उपचारदेखील केले. या प्रकारामुळे द्वारकापुरीत एकच खळबळ उडाली आहे.


या कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा द्वारकापुरीत त्यांचा दवाखाना आहे. भयंकर बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही या डॉक्टरने मास्क न लावता कित्येक रुग्णांवर उपचार केले. एवढेच नाही तर या डॉक्टरने अनेकांवर उपचार केल्यानंतर तो त्याच इमारतीत सामुदायिक नमाज पठणासाठी तो गेला, त्यामुळे आता या एका डॉक्टरमुळे अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असतानाही या डॉक्टरने रुग्णांवर उपचार सुरू ठेवले. हा सगळा प्रकार लक्षात येताच याची माहिती संबंधित व्यक्तीला देण्यात आली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. या डॉक्टरची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर देखील त्यांनी डॉक्टरला क्वारंटाईन केले नाही. त्यामुळे द्वारकापुरीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.


First Published on: April 13, 2021 4:00 PM
Exit mobile version