Corona Update : कोरोनाचे तीन हजार नवे रुग्ण, Active रुग्णांच्या संख्येत चोरपावलांनी वाढ

Corona Update : कोरोनाचे तीन हजार नवे रुग्ण, Active रुग्णांच्या संख्येत चोरपावलांनी वाढ

Corona Update From India | नवी दिल्ली – कोरोना रुग्णसंख्येत (Corona Update) आता पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ९५ रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण सक्रीय रुग्णांचा (Active Corona Patients) आकडा १५ हजार २०८ वर पोहोचला आहे. काल, ३ हजार १६ नवे बाधित रुग्ण आढळले होते. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. तर, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

देशात सध्या १५ हजार २०८ रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत ४ रुग्णांच्या मृतांची नोंद झाली आहे. यामध्ये गोवा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक मृत्यू तर, पश्चिम बंगालमध्ये २ मृत्यू आहेत. आतापर्यंत ४४,१६,९७११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत ५३०८६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, देशात सक्रीय रुग्णांचं प्रमाण ०.०३ टक्के असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Positivity Rate) ९८.७८ टक्के आहे तर, मृत्यूंचं प्रमाण (Death Rate) १.१९ टक्के आहे.

महाराष्ट्रात स्थिती काय?

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ६९४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, १८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के असून मृत्यूप्रमाण १.८२ टक्के आहे. तसंच, सध्या राज्यात ३ हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईनजिक शहरातील दैनंदिन कोरोना आकडेवारी (नवे रुग्ण)

अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी

First Published on: March 31, 2023 11:26 AM
Exit mobile version