Corona Update: देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, मृतांचा आकडा ४ हजार पार

Corona Update: देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, मृतांचा आकडा ४ हजार पार

India Corona Update:

देशात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढत झाली आहे. सलग चार दिवस कमी झालेली रुग्णसंख्या आज पुन्हा हजाराच्या पटीने वाढली. तर कोरोनामुळे मृत झालेल्या आकडेवारीनेही ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज देशात २ लाख ८ हजार ९२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोद झाली आहे. गेल्या काही दिवसांता ही रुग्णसंख्येने २ लाखाहून खालचा टप्पा गाठला होता. मात्र आज पुन्हा एकदा हा आकडा २ लाख पार झाला, गेल्या २४ तासांत ४ हजार १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांचा संख्येतही वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ८ हजार ९२१ नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ४ हजार १५७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ९५ हजार ९५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ झाला आहे. देशात २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३० लाख २७ हजार ९२५ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


 

First Published on: May 26, 2021 10:46 AM
Exit mobile version