Live Update: राज्यात गेल्या २४ तासांत ९९७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, २८ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात गेल्या २४ तासांत ९९७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, २८ जणांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

राज्यात गेल्या २४ तासांत ९९७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार १६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख २१ हजार ४२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ६४ हजार ९४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या १२ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


भाजप अध्यश्र जे.पी नड्डा मुंबईत दाखल. मुंबई महापालिका निवडणूक, संघटनात्मक बैठकीसाठी जे.पी नड्डा मुंबई दौरा करणार.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परमबीर सिंह देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करणार असल्याचे म्हटले जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या सकाळी ७ ते ८ दरम्यान शस्रक्रिया होणार आहे.


लातूरमधील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांच्या विभागात शॉर्ट सर्किट, नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे,


राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज सायंकाळी ४.३० वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.  मंत्री दालन, मंत्रालय य़ेथे ही पत्रकार परिषद होणार आहे.


किरण गोसावीला ६ दिवसांची पोलीस कोठडी


६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना, गर्भवतींनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले


मुंबई, पुण्यासह ७ ठिकाणी ईडीची छापेमारी, वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणासंबंधीत धाडी


प्रवाशांची गैरसोय करु नका, परिवहन मंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन , विरोधकांसह एसटी कर्मचाऱ्यांसह चर्चेसाठी तयारी


मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांचा जवाब नोंदवला आहे.


माझा व्हिडिओ अर्धवच दाखवून दिशाभूल करण्याचे काम – सुधीर मुनगंटीवार


एसटी कर्मचाऱ्यांनी आधी आत्महत्या थांबवा माझी अट आहे- राज ठाकरे


केंद्राने एक्साईज कमी केल्याने इंधनाचे दर कमी झाले, आता राज्यानेही उप्तादन शुल्कात कपात करावी. भाजपा नेते चंद्रकांत पाटलांचे आंदोलन, कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन


एसटी कर्मचाऱ्यांसाठी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूरात राज्य सरकारविरोधात आंदोलन


गुजरातमधून भारतात ड्रग्ज सप्लाय, माझ्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा खोटा आरोप लावण्यात आला,  देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवली, उत्तर न आल्यास मानहानीचा दावा करणार- नवाब मलिक


एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर दाखल


एसटी कर्मचाऱ्यांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये- संजय राऊत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत, दोन दिवसांत ते बाहेर येतील- संजय राऊत


एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज पुन्हा घेणार परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट


एसटीनंतर आता पुण्यात खासगी बसेस बंद करण्याचा निर्णय, सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने पुणे असोसिएशनचा निर्णय


चार अंतराळवीरांसह स्पेसएक्स रॉकेट निघाले आयएसएसवर, नासाने जारी केला थेट व्हिडिओ


यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या डॉक्टरांचे नाव अशोक पाल असे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या केली असून त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


आज हाजी अराफत शेख पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांविरोधात करणार मोठा खुलास


आज सकाळी ११ वाजता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार.


 

First Published on: November 11, 2021 10:23 PM
Exit mobile version