Corona Vaccine : सिरमच्या नवीन कोरोना लसीने कोव्हिशिल्ड अन् कोव्हॅक्सिनलाही टाकले मागे

Corona Vaccine : सिरमच्या नवीन कोरोना लसीने कोव्हिशिल्ड अन् कोव्हॅक्सिनलाही टाकले मागे

Corona Vaccine :

देशात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारत सरकार आता लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच लसनिर्मिती कंपन्यांकडूनही देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये देशात दोनशे कोटी लसींचे उद्दिष्ट्य भारत सरकारने ठेवले आहे. त्यामुळे देशाबाहेरील लशींची निर्यात वर्षाखेरीपर्यंत रोखली आहे.

सध्या भारतात तीन लशींना वापरासाठी परवानगी आहे. यातील कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशीची निर्मिती भारतात होत आहे तर तिसरी स्पुटनिक – V ही लस रशियात निर्मित होत आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस आहे. तर ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. यात कोरोनाविरोधी कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादनही आता सिरममध्ये घेतले जात आहे. या लसीच्या परिणामकारकतेत कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनलाही मागे टाकले आहे. तर उत्पादनातही ही लस अग्रेसर ठरणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशात कोव्होव्हॅक्स लशीचे २० कोटी लसीचे डोस भारतात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोव्होव्हॅक्स लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट अमेरिकेतील नोव्होव्हॅक्स कंपनीसह

कोव्होव्हॅक्स लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट अमेरिकेतील नोव्होव्हॅक्स कंपनीसह करत आहे. अमेरिकेत या लसीच्या अंतिम चाचण्या पार पडल्या. याविषयी नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले की, मध्यमआणि तीव्र स्वरुपाच्या कोरोना विषाणूच्या संसर्गावर ही लस १०० टक्के संरक्षण देते. तसेच लसीची एकूण संरक्षण क्षमता ९०.४ टक्के आहे. अमेरिका आणि मेक्सिकोमधील ११९ शहरांमध्ये या लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. यासाठी २९ हजार ९६० जणांनी सहभाग घेतला. परंतु अद्याप या लसीला भारतात परवानगी मिळाली नाही.

कोव्होव्हॅक्स परिणामकारकता  ९०.४ टक्के

परंतु कोव्होव्हॅक्स लशीच्या परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ९०.४ टक्के आहे. तर अमेरिकेतील फायजर लस ९१. ३ आणि मॉर्डना लस ९० टक्के प्रभावी आहे. तसेच कोव्हिशील्डचा प्रभाव ७६ टक्के तर कोव्हॅक्सीनचा प्रभाव ८१ टक्के आहे. त्यामुळे कोव्होव्हॅक्स लसीचा प्रभाव सर्वाधिक असल्याचे समोर येत आहे.

कोव्होव्हॅक्स ही लस महत्वाची भूमिका बजावणार

सध्या देशातील कोव्हिशील्ड ही लस अधिक कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे समोर येत आहे. तर नव्याने स्पुटनिक व्ही या लशीचाही काही प्रमाणात वापर सुरु होत आहे. स्पुटनिक व्ही लशीचा प्रभाव ९१. ६ टक्के असून हा प्रभाव जवळपास कोव्होव्हॅक्स लशीएवढीच आहे. सध्या सिरम कंपनीने या लशीचे दर महिन्याला १० कोटी डोस उत्पादित करण्याची योजना आखली आहे. तर तिसऱ्या तिमाहीअखेर हा आकडा दरमहा १५ कोटींच्यावर जाईल. जागतिक आरोग्यव्यवस्थेवर ओढावलेल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी कोव्होव्हॅक्स ही लस महत्वाची भूमिका बजावणार असे म्हटले जात आहे. जगातील आरोग्यस्थिती पाहता सध्याच्या काळात या लशीची अतिशय आवश्यकता आहे, असेही नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे.


 

First Published on: June 16, 2021 8:24 PM
Exit mobile version