Corona Vaccine: लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका कमी, ICMR चा दावा

Corona Vaccine: लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका कमी, ICMR चा दावा

Covid19 Vaccine: राज्यात १ कोटी लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस, महाराष्ट्र ठरले देशातील सर्वाधिक लसीकरण करणारे राज्य

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) लसीकरण आणि कोरोना संसर्गासंबंधी एक प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये ७६ टक्के पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या. या पॉझिटिव्ह लोकांपैकी केवळ १७  टक्के रुग्ण लक्षणविरोधी होते,केवळ १० टक्के लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती, असे ICMRने म्हटले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता फारच कमी आहे. २७ लोकांना जर रुग्णालयात दाखल केले तर त्यातील केवळ १ रुग्णाचा मृत्यू होत आहे. ICMRच्या या रिपोर्टनुसार, कोरोना लस कोरोनाविरोधी लढण्यासाठी महत्त्वाचे काम करत असल्याचे समोर आले आहे. ( Corona Vaccine: Two doses of vaccine reduce the risk of corona, ICMR claims)

ओडीसामध्ये वेगवेगळया हेल्थकेअर सेंटरमध्ये १ मार्च ते १० जून पर्यंत ३६१ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या अधिक होती. भुवनेश्वर येथील ICMR च्या लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या सँम्पल्समधील २७४ लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. लसींचे दोन डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये १४ दिवसांनंतर एंटिबॉडीज तयार होणे सुरू झाले.

मेडिकल जर्नल रिसर्च स्क्वायर मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, २७४ कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये १२.८ टक्के लोकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती तर ८७.२ टक्के लोकांनी केव्हिशिल्ड लसीची दोन डोस घेतले होते. यात ४३टक्के लोकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती जे पेशाने हेल्थ केअर वर्कर्स होते. तर कोव्हिशिल्ड लस घेतलेले १० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते.


हेही वाचा – mumbai vaccination scam : मुंबईत 2 हजार 53 नागरिकांना दिली बोगस लस

First Published on: June 25, 2021 9:43 AM
Exit mobile version