Video – घरी पोहचण्यासाठी मजुराने केला ‘असा’ जुगाड की बघणारे आश्चर्यचकीत झाले!

Video – घरी पोहचण्यासाठी मजुराने केला ‘असा’ जुगाड की बघणारे आश्चर्यचकीत झाले!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा देशात सुरू आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. गरीब मजूर घरी परतण्यासाठी निघाले आहेत. कोणी चालत, तर कोणी मिळेल त्या वाहनाने गाव गाठत आहेत. यावेळी मजूर करत असलेला जुगाड चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये या व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत घरी पोहोचण्यासाठी केलेली कल्पना भारी आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासह घरी पोहोचण्यासाठी बाईकवर स्विंग जोडले आहे. यासह त्याने दुचाकीचे रूपांतर चार चाकीमध्ये केलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने स्टेअरिंगवर झुल्याला दुचाकीशी जोडले आहे. स्टेअरिंगवर झुल्याशी संतुलन साधत तो माणूस रस्त्यावर फिरताना दिसत आहे. लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

हा व्हिडिओ मारीको कंपनीचे चेअरमन हर्ष मारिवाला यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे आणि लिहिले आहे की कदाचित असा प्रवास करणे सुरक्षित माध्यम नसेल परंतु त्यामुळे त्यांने दुचाकीचे रूपांतर चार चाकी कारमध्ये केलं आहे.


हे ही वाचा – ‘या’ राज्यांवर कोरोनानंतर ‘अम्फान’ चक्रीवादळाचे संकट!


 

First Published on: May 18, 2020 10:25 AM
Exit mobile version