Coronavirus: कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो?

Coronavirus: कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो?

जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणुवर ताबा मिळवण्यात अपयश आले आहे. रूग्णांमधे कोरोना विषाणुची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो, असा दावा अमेरिकेतील येल विद्यापीठातील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ लोकेश शर्मा यांनी केला आहे. रूग्णांमधे कोरोना विषाणुची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो. त्यामुळे व्हायरसचा प्रसार थांबविणे कठीण होत आहे, असे अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पीरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी हे संशोधन २८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान उपचार घेतलेल्या सोळा कोरोनाग्रस्त रुग्णांवर केले. एका दिवसाच्या अंतराने सर्व रुग्णांच्या स्वाबच्या नमुना घश्यातुन घेतला. रुग्णालयातून कोरोोनाचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णालाही अनेक दिवस विषाणू असल्याचे आढळून आले.


हेही वाचा – Coronavirus: जर्मनीत कोरोनाचा कहर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५८,२४७ वर

विलगीकरणाचा कालावधी वाढवा

जर कोरोनाची सामान्य लक्षणे आढळून आल्यावर क्वारंटाईन केले जाते. तसेच रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहायला सांगतात. मात्र, रुग्ण बरा झाल्यानंतरसुद्धा रुग्णांमध्ये कोरोनाचे विषाणू असतात. त्यामुळे क्वारंटाईनचा कालावधी अजून दोन आठवड्यांनी वाढवावा, असे संशोधनात म्हटले आहे.

 

First Published on: March 29, 2020 4:53 PM
Exit mobile version