Corona Virus: मे अखेरीस भारतातील दुसरी लाट ओसरण्याची शक्यता – विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग

Corona Virus: मे अखेरीस भारतातील  दुसरी लाट ओसरण्याची शक्यता – विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग

देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घातल आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सर्व नागरिक हैराण झाले आहेत. विविध स्थरातील लोकांचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाची ही तीव्र लाट मे महिन्याच्या अखेरीस ओरणार असल्याची शक्यता प्रसिद्ध विषणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी अनेक दिवस अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासानुसार जुन महिन्याच्या सुरुवातीला भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेल असे समोर आले होते. मात्र आता ही लाट मे महिन्याच्या अखेरीस ओसरण्याची शक्यता असल्याचे डॉ. कांग यांनी सांगितले आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसी लोकांना सुरक्षित करत आहे. लस घेतल्यामुळे कोरोना एकामार्फत दुसऱ्यापर्यंत पसरत नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाला असणारा धोका कमी होत आहे. पुढील काळात कोरोनाचे संक्रमण किंवा ही साखळी तोडणे शक्य असल्याचे डॉ. कांग यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे डॉ. कांग यांनी भारतात लॉकडाऊन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात देशातील वाढती रुग्णसंख्या कमी करायची असेल तर देशात आतापासून लॉकडाऊन लावणे गरजेचे. लॉकडाऊनचा परिणाम आपल्याला पुढील काही दिवसात दिसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. गगनदीप कांग जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीच्या फेलोपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी महिला पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यात त्यांनी भारतातील कोविशिल्ड आणि कोव्हक्सिन लसीबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर भारतात लवकरच आणखी लसी उपलब्ध होतील असेही त्या म्हणाल्या


हेही वाचा – Covid-19 vaccine: १२ ते १५ वर्षांच्या मुलांनाही लस देणारा पहिला देश; कॅनडात Pfizer लसीला मंजूरी

First Published on: May 6, 2021 2:10 PM
Exit mobile version