थायलंडमध्ये कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहातून पसरला कोरोनाचा विषाणू

थायलंडमध्ये कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहातून पसरला कोरोनाचा विषाणू

थायलंडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्याला संसर्ग झाला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही बाब उघडकीस आल्यानंतर, तज्ज्ञांनी शवगृह आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी संक्रमण पसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बँकॉकच्या वैज्ञानिकांनी जर्नल ऑफ फोरेंसिक कायदेशीर औषध अभ्यासात या बाबतची माहिती दिली. हे संशोधन बँकॉकमधील आरव्हीटी मेडिकल सेंटरच्या वॉन श्रीविजीतालाई आणि चीनच्या हेनान मेडिकल युनिव्हर्सिटीच्या विरोज वायवानिटकिट यांनी केलं आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना संक्रमित जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या संपर्कात येण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान केली पाहिजेत.

अंत्यसंस्कार करताना काळजी घ्या

तज्ञांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजेत. रुग्णालयातून मृतदेह काळजीपूर्वक अंत्यसंस्कारासाठी पाठवा. श्रीलंकेच्या सरकारनेही मृतदेहाद्वारे होणार्‍या संसर्गाचा धोका लक्षात घेता मुस्लिम लोकांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून सर्व मृतदेह जाळण्याचे आदेश दिले आहेत. अनेक मुस्लिम समुदायाच्या मृतदेहांचे येथे दहन करण्यात आलं आहे.

 

First Published on: April 16, 2020 12:18 PM
Exit mobile version