संरक्षण सचिवांमध्ये कोरोनाची लक्षणे, ३५ जणांना केले होम क्वारंटाइन

संरक्षण सचिवांमध्ये कोरोनाची लक्षणे, ३५ जणांना केले होम क्वारंटाइन

संरक्षण सचिव यांच्यात कोरोना विषाणूची लक्षणं दिसुन आली आहेत. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रेस करायचं काम सुरु आहे. बुधवारी सकाळी संरक्षण सचिव यांच्यात कोरोना संक्रमणाची लक्षणं दिसून आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयातील ३५ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अलग ठेवण्यासाठी पाठविले गेले आहे. संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय रायसीना हिल्सच्या दक्षिण ब्लॉकमध्ये आहे. संरक्षण सचिवांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी आणि रायसिना हिल्सच्या साऊथ ब्लॉकमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जात आहे.

तथापि, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही भाष्य करण्यास नकार दिला, पण दोन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की संरक्षण सचिव कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सावधगिरी म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग कार्यालयात येत नाही आहेत. संरक्षण सचिव उच्च सैन्य अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामील असतात. संरक्षण सचिव, लष्करप्रमुख एमएम नरवणे आणि नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल करंबीर सिंग यांचं कार्यालय हे दक्षिण ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावर आहे.


हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकित दोन महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘एक देश एक बाजार’


 

First Published on: June 4, 2020 7:54 AM
Exit mobile version