Corona Wave : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप; केंद्राने सर्व राज्यांना केल्या ‘या’ सूचना

Corona Wave : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप; केंद्राने सर्व राज्यांना केल्या ‘या’ सूचना

Corona Wave : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप; केंद्राने सर्व राज्यांना केल्या या सूचनाCorona Wave : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप; केंद्राने सर्व राज्यांना केल्या या सूचना

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सर्व राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना उच्च पातळीवर दक्षता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या वाढवण्याचे आणि कोरोना निर्बंधांचे पालन करण्याबरोबर रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कारण दक्षिण पूर्व आशिया, चीन आणि यूरोपमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना निर्बंध पुन्हा कडक होत आहेत.

बुधवारी एका उच्चस्तरीय बैठकीत मंत्री मनसुख मांडविया यांनी 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला. तथापि, पूर्वीचा आदेश रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “चीन, सिंगापूर, व्हिएतनाम आणि युरोप या शेजारील देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने आरोग्यमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले. यावेळी त्यांनी कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्या म्हणजे कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणे, सिक्वेन्सिंग चाचण्या वाढवणे आणि देशात उच्च पातळीची दक्षता राखणे.

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच

चीनने पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे शांघाय, बीजिंग, शेनझेंग आणि जिलिनमध्ये रस्त्यावर शांतता आहे. घरातून मोजकेच लोक बाहेर पडत आहेत. लोकांना 20 मार्चपर्यंत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. चीनमध्ये अघोषित कर्फ्यू आहे. चीनमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच 2019-20 मध्ये एका दिवसात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुमारे 5200 होती, परंतु आता हा आकडा मागे राहिला आहे.

यामुळे 20 मार्चपर्यंत, चीनमध्ये सर्व अनावश्यक कामे बंद ठेवण्यात आली आहेत. तर सार्वजनिक वाहतूक आणि अनावश्यक वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय चीनमधील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या जात आहे. चीनमधील या कोरोना स्थितीमुळे जवळपास ५ कोटी लोक लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. दरम्यान चीनची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या नव्या लाटेला रोखण्यात असमर्थ ठरत आहे. चीनमध्ये सध्या Omicron चा subvariant Omicron BA.2 दुसऱ्या भाषेत त्याला Stealth Omicron असेही म्हणतात, या विषाणूने थैमान घातले आहे.


 

 

First Published on: March 18, 2022 7:37 AM
Exit mobile version