करोना व्हायरस : करोनाचे ४० वर्षांपूर्वीच्या पुस्तकातील भाकीत?

करोना व्हायरस : करोनाचे ४० वर्षांपूर्वीच्या पुस्तकातील भाकीत?

करोना व्हायरस

चीनमध्ये धुमाकूळ माजवणार्‍या करोना व्हायरसची धास्ती सध्या जगभरात पसरली आहे. चीनच्या वुहान शहरातून या प्राणघातक विषाणूचा जगात अनेक ठिकाणी फैलाव झाला आहे. तसेच हा विषाणू नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचेही बोले जात आहे. अर्थातच हा आरोप चीनने फेटाळला आहे. मात्र, अद्याप या विषाणू मागचे सत्य समोर आलेले नाही. दरम्यान, त्यातच आता ४० वर्षांपूर्वीचे एक पुस्तक चर्चेत आले आहे. या पुस्तकात वुहान शहरातच मानवनिर्मित विषाणूने अनेक लोकांचे बळी गेले, असे म्हटले होते.

काल्पनिक कंदबरीत करोनाचा उल्लेख

चीनमधील वुहानमधील करोना संसर्गाचे भाकीत ४० वर्षांपूर्वीच्या एका काल्पनिक कादंबरीत असलेल्याचे म्हटले जात आहे. ‘द आईज ऑफ डार्कनेस’, असे या कादंबरीचे नाव असून डेन कुंट्स या अमेरिकन लेखकाने ती लिहिली आहे. या कादंबरीमध्ये ‘वुहान ४००’, असे एका विषाणूला नाव देण्यात आले आहे. तसेच हा विषाणू म्हणजे जैविक युद्धासाठी प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले एक शस्त्र असल्याचे लेखकाने त्यामध्ये म्हटले होते. याबाबत पुस्तकातील उतारे दर्शवणारी पोस्ट डॅरेन प्लायमाऊथ या व्यक्तीने ट्विटरवर केली आणि त्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे या कादंबरीत

या कादंबरीत म्हटले आहे की, ‘वुहान शहराबाहेर असणाऱ्या आरडीएनए प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती ४०० व्या पेशींपासून करण्यात आली आहे. या विषाणूचा परिणाम केवळ मानवावरच होईल आणि हा विषाणू मानवी शरीराबाहेर एका मिनिटापेक्षा अधिक काळ जिवंत राहणार नाही’, असे देखील यात म्हटले आहे.


हेही वाचा – म्हाडा करणार कामाठीपुराचा समूह पुनर्विकास – जितेंद्र आव्हाड


 

First Published on: February 18, 2020 10:01 AM
Exit mobile version