Coronavirus : जगभरात Omicron विषाणूचे १६० रुग्ण, विविध देशांमधील रुग्णसंख्या नेमकी किती?

Coronavirus : जगभरात Omicron विषाणूचे १६० रुग्ण, विविध देशांमधील रुग्णसंख्या नेमकी किती?

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील अनेक देशांमधून ओमिक्रॉनची जवळपास १६० प्रकरणं समोर आली आहेत. यात युरोपातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सावाना, ब्रिटन, ऑस्टेलिया, डेनमार्क, इस्त्राइल, बेल्जियम, चेक गणराज्य, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग देशांचा यात समावेश आहे. यात दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन विषाणूचे जवळपास ९९ प्रकरणं समोर आली आहेत. तर हाँगकाँगमधून २५, नेदरलँड १३, बोत्सवाना ६ आणि ब्रिटनमधून ३ प्रकरणं समोर आली आहे. यात ऑस्ट्रेलिया, डेनमार्क आणि बेल्जियममध्ये प्रत्येक २ आणि इस्त्राइल, चेक गणराज्य, इटली आणि जर्मनीमधून प्रत्येकी १ -१ प्रकरणं समोर आली आहेत. मात्र भारतात ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधित रुग्ण

जगभरातील ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूंचे रुग्ण आढळून आले आहेत त्या देशांमधील आकडेवारी आणि रुग्णांच्या स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. यात सर्वाधित रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेत आढळले आहेत. या सर्वाधिक रुग्णांकडून अंगदुखी आणि माइल्ड इन्फेक्शनच्या तक्रारी येत आहे. मात्र गंभीर प्रकरणं समोर आलेली नाही.

ओमिक्रॉनबाधित रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री नेमकी काय? 

मात्र बेल्जिअममध्ये आढळलेल्या २ रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री दक्षिण आफ्रिकेतील नाही तर इथोपिआ आणि टर्की देशातील आहे. तर युकेमध्ये आढलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री एमस्टरडम आहे. यात इस्त्राइलमध्ये आढलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री देखील दक्षिण आफ्रिका नाही. यामुळे ७- १० दिवसांत पूर्ण स्थिती समजू शकणार आहे. यात भारत अद्याप ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण आढळलेले नाही.


Omicron Variant : महाराष्ट्रातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार – राजेश टोपे


First Published on: November 29, 2021 2:37 PM
Exit mobile version