दिलासा! देशात ७० लाखाहून अधिकांनी केली कोरोनावर मात; दिवसभरात ५३,३७० नवे रूग्ण

दिलासा! देशात ७० लाखाहून अधिकांनी केली कोरोनावर मात; दिवसभरात ५३,३७० नवे रूग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात ७० लाखाहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी रेट ८९.७८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, शनिवारी सकाळपर्यंत देशभरात बरे झालेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या ७०,१६,०४६ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात कोरोनातून ६७ हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत असून नवे रूग्ण देखील कमी प्रमाणात आढळत आहे. तर कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या २४ तासात देशात १४ हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये घट झाली असून सध्या ६८०६८० इतक्या रूग्णांवर उपचार सुरू आहे.

तसेच, देशात गेल्या २४ तासात ५३ हजार ३७० कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्याच आली असून सध्या ७८ लाख १४ हजार ६८२ कोरोनाबाधित रूग्ण आहे. तर ६५० जणांचा दिवसभरात कोरोनामुळे बळी गेल्याने आतापर्यंत बळींचा आकडा हा १ लाख १७ हजारांवर पोहोचला आहे.

First Published on: October 24, 2020 10:10 AM
Exit mobile version