Coronavirus : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

Coronavirus : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करत स्व:ता याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोना टेस्ट करत आयसोलेट होण्याचे आवाहन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सौम्य लक्षणं दिसच असून मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी होम आयसोलेट होत कोरोना टेस्ट करावी.

मुंबई पाठोपाठ दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यात सोमवारी दिल्लीत कोरोनाचे जवळपास 4099 नवे रुग्ण आढळून आले. रविवारच्या तुलनेत ही संख्या २८ टक्क्यांनी अधिक होती. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एक रुग्णाचा मृत्यू झालाय तर संक्रमणाचा टक्का 6.46 वर पोहचलाय.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन अंतर्गत लागोपाठ दोन दिवस संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यास दिल्लीत रेड अलर्ट जारी करत कर्फ्यूची स्थिती निर्माण होईल, तसेच सर्व व्यवहार ठप्प केले जातील.


Unemployment Rate: बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर; डिसेंबरमध्येच 7.91 टक्क्यांची वाढ


First Published on: January 4, 2022 9:17 AM
Exit mobile version