सामाजिक अंतर गरजेचं; श्वासोच्छवासाद्वारे होतो कोरोनाचा प्रसार

सामाजिक अंतर गरजेचं; श्वासोच्छवासाद्वारे होतो कोरोनाचा प्रसार

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणू श्वासोच्छवासाद्वारे आणि बोलण्याद्वारे पसरतो, असा दावा अमेरिकेच्या एका उच्च-स्तरीय पॅनेलने केला आहे. पॅनेलने बुधवारी असं म्हटलं की रोग परसवणारा विषाणू हवेत उपस्थित आहे. हा विषाणू पूर्वीपेक्षा सहज लोकांमध्ये पसरत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा लोक श्वास बाहेर टाकतात तेव्हा विषाणू त्यातून तयार झालेल्या अल्ट्रा फाईन मिस्टमध्ये जिवंत राहतो. “सध्याचे संशोधन मर्यादित आहे, श्वासोच्छवासामुळे विषाणूचा प्रसार होतो, असं या अभ्यासात दिसून येतंय,” असं विज्ञान, अभियांत्रिकी व औषध समितीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. हार्वे फिनबर्ग यांनी एका पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा – गहू आणायला बाहेर पडला म्हणून पोलिसांनी मारलं; कामगाराने केली आत्महत्या


ही समिती संसर्गजन्य रोग आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या धोक्यांशी संबंधित विज्ञान आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात अमेरिकन सरकारला मदत करते. हा विषाणू इतक्या वेगाने का पसरत आहे हे स्पष्ट करू शकतो आणि याचा एक पुरावा देखील सापडला आहे, असे एका विषाणूज्ज्ञांनी सांगितले. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाउन आणि सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरते. विशेषतः भारतासारख्या अत्याधिक वस्ती असलेल्या देशांमध्ये वायूजनित विषाणू आणि जीवाणू अधिक संक्रामक आणि चिंताजनक आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनूसार आतापर्यंत भारतात कोवि -१९ संसर्ग झालेल्यांची संख्या २५६७ तर मृतांची संख्या ७२ वर पोहोचली आहे.

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरचे माजी अध्यक्ष आणि विषाणूशास्त्र प्राध्यापक डॉक्टर जेकब जॉन म्हणाले, “आम्हाला माहित आहे की कोविड -१९चा विषाणू क्षयरोग आणि गोवर इतका संसर्गजन्य नाही परंतु हंगामी फ्लूपेक्षा जास्त संक्रामक आहे.” दरम्यान, खोकला किंवा शिंकण्यातून कोविड-१९ विषाणूचा प्रसार होतो, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि थकवा आणि श्वास घेण्यात अडचण ही आहेत.

 

First Published on: April 4, 2020 9:30 AM
Exit mobile version